39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeगुणवत्तेच्या आधारावरच निवड : कोहली

गुणवत्तेच्या आधारावरच निवड : कोहली

एकमत ऑनलाईन

वडिलांनी संघात निवडीसाठी कधीच दिली नाही लाच

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने लॉकडाऊनच्या निमित्ताने क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीबरोबर इन्स्टाग्रामवर एक तास मनसोेक्त गप्पा मारल्या. विराट म्हणाला, एक काळ असाही होता की माझ्या वडिलांनी ज्युनियर स्टेट संघाची निवड करण्यासाठी लाच घेण्यास नकार दिला होता. निवडकर्ते त्यांना म्हणाले, गुणवत्तेचा प्रश्न नाही, तुम्हाला काहीतरी करावे लागेल. याचा नेमका अर्थ माझ्या वडिलांना कळला नाही.

Read More  बंधणे शिथील करण्याचे अधिकार राज्यांना नाहीत!

यशस्वी वकिलीसाठी आयुष्यभर मेहनत करणारे ते एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व होते. ते निवडकर्त्यांना इतकेच म्हणाले, विराटची निवड करायची असेल तर ती गुणवत्तेच्या आधारावरच करा. मी काही देऊ शकणार नाही. निवड न झाल्याने मी खूप रडलो. खचून गेलो. पण वडिलांच्या या गोष्टी मला खूप काही शिकवून गेल्या. यश प्राप्त करायचे तर अनन्यसाधारण बनावे लागेल याची जाणीव झाली. शिखर गाठायचे तर अशी गोष्ट कर की जी कोणीही केली नाही व ती मेहनतीने आत्मसात कर असे ते म्हणायचे. हे शब्द मनावर कायमचे कोरले गेले. मग काय स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मी झोकून दिले. छेत्रीने संस्मरणीय क्षणांबद्दल छेडताच विराट म्हणाला, १९९६च्या विश्वचषकात व्यंकटेश प्रसादने आमिर सोहेलची घेतलेली विकेट सर्वांत संस्मरणीय आठवण असून तो माझ्या जीवनातील एक सुवर्णक्षण होता.

Read More  अमेरिकेत पहिली मानवी चाचणी यशस्वी!

बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा
बायोपिकसाठी माझी तयारी आहे, पत्नी अनुष्कानेही या चित्रपटात काम करावे असे विराट म्हणाला. आज माझे जे व्यक्तिमत्त्व आहे, त्याचे बहुतांश श्रेय मी अनुष्काला देईन. तिची भेट होण्याआधी मी खूप आत्मकेंद्रित होतो, माझ्याच कम्फर्ट झोनमध्ये रहायचो. माझे जे काही व्यक्तिमत्त्व आहे त्यात चांगला बदल करण्याची गरज असल्याची अनुभूती मला अनुष्कामुळे मिळाली असे त्याने आवर्जून सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या