22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरफिजीकल डिस्टन्ससाठी चापोलीत स्वयंशिस्त

फिजीकल डिस्टन्ससाठी चापोलीत स्वयंशिस्त

एकमत ऑनलाईन

चापोली : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाच्या पादुर्भावाला अटकाव करण्यासंबंधी लॉकडाऊन संदर्भात संबधित काही नियमावली घालून दिलेली आहे. त्या अनुषंगाने चाकूर तालुक्यातील चापोली येथील तरुणांनी सामाजिक तथा गर्दीच्या ठिकाणी फिजीकल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करण्यासाठी छत्रीचा वापर करून जिल्हाधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. तसेच चापोलीसह परीसरात नागरीकांना स्वंय शिस्तीचा एक आदर्श घालून दिला आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्या लक्षात घेता संसर्गाची साखळी व प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकºयांनी दि.१५ ते ३० जुलै दरम्यान तीन टप्पात लॉकडाउन जाहीर केला. त्यात पहिल्या टप्प्यांत १५ ते २० तारखे दरम्यान सबंध जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर दुस-या टप्प्यात दि.२१ जुलैपासून लॉकडाऊनसंबंधी नियमावलीत काही अंशी शिथिलता करून गर्दी टाळण्यासाठी व फिजीकल डिस्टन्स पाळण्यासाठी छत्री वापरण्याचे आवाहन दि.२० जुलै रोजी जिल्हाधिकाºयांनी संबध जिल्हावासीयांना केले होते.त्या अनुषंगाने चापोली येथील रमेश पाटील, रमाकांत स्वामी, संदीप आबंदे, शाम मद्रेवार, माऊली मद्रेवारसह अन्य तरुणांनी स्वयंशिस्तीचा आदर्श घालून दिला आहे.

Read More  अन्य महामंडळांना मुदतवाढ द्या

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या