23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयएकीकडे आत्मनिर्भर तर दुसरीकडे परदेशी विमाने; मोदींचा दुटप्पीपणा समोर-येचुरी

एकीकडे आत्मनिर्भर तर दुसरीकडे परदेशी विमाने; मोदींचा दुटप्पीपणा समोर-येचुरी

एकमत ऑनलाईन

सतत वाढणारे पेट्रोल डीझेलचे भाव या मुद्द्यावरूनही मोदी सरकारला सुनावले; जनतेच्या हालअपेष्टांमधूनही फायदा उठवण्याची बाब लज्जास्पद

दिल्ली : देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनण्याचा संदेश दिला. याच पार्श्वभूमीवर “एकीकडे देशासाठी आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा दिल्या जातात. तर दुसरीकडे स्वत:साठी परदेशी विमाने खरेदी केली जातात”, हा विरोधभास दाखवून देत माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मोदींवर टीका केली.

पुढे त्यांनी म्हटले की, बोईंग या अमेरिकी कंपनीकडून भारत दोन आलिशान विमाने घेणार आहे. त्या विमानांचा वापर पंतप्रधान आणि इतर भारतीय उच्चपदस्थांसाठी केला जाणार आहे. तर स्थलांतरित मजूर, शेतकऱ्यांना करोना संकटाच्या काळात कुठलाच दिलासा दिला गेला नाही, असे बोलून त्यांनी मोदींचा दुटप्पीपणा समोर आणला आहे.

यावेळी त्यांनी सतत वाढणारे पेट्रोल डीझेलचे भाव या मुद्द्यावरूनही मोदी सरकारला सुनावले आहे. त्यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर घसरले तेव्हा सरकारने त्याचा लाभ जनतेला मिळू दिला नाही. सरकारने इंधनांवरील उत्पादन शुल्क वाढवले. आता जगण्यासाठी धडपडणाऱ्या जनतेवर आणखी आर्थिक बोजा टाकला जात आहे. जनतेच्या हालअपेष्टांमधूनही फायदा उठवण्याची बाब लज्जास्पद आहे.

Read More  गाइडलाइन्स जारी : 6 टप्प्यात सुरू होणार शाळा; सम-विषम फॉर्म्युला

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या