28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाकडून सेनेची मैदानकोंडी ; मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांवर नजर

शिंदे गटाकडून सेनेची मैदानकोंडी ; मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांवर नजर

एकमत ऑनलाईन

मुंबई : दसरा मेळावा जसजसा जवळ येत आहे तसतसा राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये राजकारण पेटू लागले आहे. मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची रस्सीखेच सुरू असतानाच शिंदे गटाने प्लॅन बी सुद्धा तयार ठेवला आहे. शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा घेण्याचा हक्क आपला आहे,

असे सांगत शिंदे गटाने ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकला आहे. केंद्र आणि राज्यात असलेली भाजपची सत्ता पाहता मुंबई महानगरपालिकेकडून दसरा मेळावा घेण्याचा हक्क शिंदे गटाच्या पारड्यात टाकला जाऊ शकतो. तसे झाल्यास शिवसेनेची अनेक दशकांची दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊ शकते.

प्रथम येणा-यास प्राधान्य हे शिवाजी पार्कबाबत मुंबई महापालिकेचे धोरण आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर आधी अर्ज करणा-या ठाकरे गटाला प्राधान्य मिळू शकते. परिणामी शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी एमएमआरडीए मैदानाचा पर्याय तयार ठेवत त्यासाठी अर्जही केल्याची माहिती आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाने मेळाव्यासाठीचा अर्ज केला आहे. हे ठिकाण म्हणजे बीकेसी येथे असणारे एमएमआरडीए मैदान.

मोठमोठी मैदाने बुक
ठाकरे गटाला मैदान मिळू नये म्हणून शिंदे गटाने मोठमोठी मैदानं बुक केली आहेत. परळ येथील नरे पार्क, सायनमधील सौमय्या मैदान, गोरेगावमधील नेस्को आणि अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स अशी अनेक मोठी मैदाने बुक करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या