24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्रपरप्रांतीय मजुरांसाठी स्वतंत्र रेल्वे

परप्रांतीय मजुरांसाठी स्वतंत्र रेल्वे

आतापर्यंत ७ हजार ६७७ परजिल्हा व परराज्यातील मजूर, विद्यार्थी गावी परतले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिह्यात अडकलेले परजिल्हा व परराज्यातील मजूर विद्यार्थी यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी गुगल फॉर्मची व्यवस्था करण्यात आली. त्यावर ऑनलाईन पद्धतीने १३ हजार ५९० लोकांची नोंदणी झालेली आहे तर आतापर्यंत ७ हजार ६७७ परजिल्हा व परराज्यातील मजूर विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आलेले आहे. उर्वरित ५ हजार ९१३ लोकांना पाठविण्याची कार्यवाही सुरू असून त्यातील यूपी-बिहारमधील २ हजारांपेक्षा अधिक मजूर असून त्यांच्यासाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरू असल्याची जिल्हा प्रशासनाने दिली़

लॉकडाऊनमुळे लातूर जिल्ह्यात अडकलेल्या १३ हजार ५९० परराज्यातील नागरिकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती़ त्यापैकी ५ हजार ७७७ जणांना तहसीलकडून पास देण्यात आले आहेत तर एक हजार ९०६ जणांना ई-पास मिळाला आहे़ परवानगी मिळालेल्या नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची प्रक्रिया गेल्या २ दिवसांपासून सुरू आहे़ आतापर्यंत लातूर, अहमदपूर, औसा, रेणापूर येथून प्रत्येकी २ बसेसद्वारे परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले आहे़ दरम्यान ८४२ परराज्यातील व्यक्ती स्वत:च्या वाहनाने त्यांच्या मूळ गावी गेले आहेत़

आतापर्यंत उत्तर प्रदेशातील २ हजार ४२ व्यक्तींना पास देण्यात आलेला आहे़ सद्य:स्थितीत ५ हजार ९१३ व्यक्तींच्या पास देण्याची प्रक्रिया सुरू होती़ आता जिल्ह्यात केवळ १२०० लोक परराज्यातील आहेत़ तेही पुढील २ दिवसांत त्यांच्या मूळ राज्यात जातील़ परराज्यातील मजुरांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने सोडण्यास प्रारंभ झाला आहे़ लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा येथील बस स्थानकांतून प्रत्येकी २ बसेसद्वारे प्रवाशांना रवाना करण्यात आले आहे़ मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत त्यांना सोडण्यात आले असल्याचे वाहतूक नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले़

२-३ दिवसांत सर्व जण मूळ गावी जातील
दि़ २९ एप्रिलला केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीनुसार राज्याने ३० एप्रिलला अधिसूचना दिली आणि १ मेपासून परराज्यातील, परजिल्ह्यातील नागरिक पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली़ आॅनलाईन अर्ज घेण्यात आले़ आता ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून येत्या २-३ दिवसांत परराज्यातील नागरिक त्यांच्या मूळ गावी जातील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली़

औरंगाबाद येथून रेल्वे
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मराठवाड्यातील परप्रांतीय मजुरांना घेऊन नांदेड व औरंगाबादहून रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना होत आहेत़ लातूर जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील २ हजार ४२ मजूर अडकले आहेत़ त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याचा परवाना देण्यात आला आहे़ औरंगाबाद येथून उत्तर प्रदेशसाठी निघणा-या रेल्वेसाठी यातील २०० लोकांना पाठविण्यात आले़ गुरुवारी सकाळी ७ वाजता लातूर येथून एस़ टी़ महामंडळाच्या बसने त्यांना औरंगाबादला सोडण्यात येणार आहे़ तेथून ते रेल्वेने उत्तर प्रदेशला जातील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली़

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या