38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeनिवड प्रक्रियेवरून गंभीर, एमएसके प्रसाद यांच्यात वाद

निवड प्रक्रियेवरून गंभीर, एमएसके प्रसाद यांच्यात वाद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संघ २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य फेरीत पराभूत झाला. विश्वचषक स्पर्धेसाठी संघात निवडलेल्या खेळाडूंवरून सुरुवातीपासूनच निवड समितीवर टीका झाली. विशेषत: अंबाती रायडूसारख्या अनुभवी खेळाडूला वगळून केवळ ५ सामान्यांचा अनुभव असलेल्या विजय शंकरला संघात स्थान दिल्यामुळे निवड प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. याच मुद्यावरून नुकतीच भर कार्यक्रमात माजी खेळाडू गौतम गंभीर आणि निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यात
जुंपली.

एमएसके प्रसादचे प्रत्युत्तर
आपल्यावर अशाप्रकारे प्रश्न उपस्थित झालेला पाहून प्रसाददेखील आक्रमक झाले. ते म्हणाले, ‘‘संघात वरच्या फळीत असलेले रोहित, धवन आणि विराट हे कोणीही गरज पडल्यास गोलंदाजी करण्यास फारसे तयार नव्हते. अशा वेळी चौथ्या क्रमांकावरील खेळाडू हा फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकणारा असावा, असा आमचा संघ निवडताना विचार होता. विजय शंकर याची देशांतर्गत स्पर्धांतील कामगिरी चांगली होती, म्हणूनच त्याला संघात स्थान देण्यात आले होते.’’

Read More  भोकर येथे जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद

के. श्रीकांत यांची मध्यस्थी
याच चर्चेत माजी क्रिकेटपटू श्रीकांत देखील सहभागी होते. त्यांनीदेखील यावर मत व्यक्त केले. ‘‘माझा गंभीरला पाठिंबाही नाही आणि प्रसादच्या वक्तव्याला विरोधही नाही. पण मला इतकेच वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट यात फरक आहे. तो लक्षात घेऊन संघाची निवड व्हायला हवी’’, असे मत व्यक्त करत त्यांनी वाद काहीसा शांत केला.

असे वागणे शोभते का? : गौतम गंभीर
कोणत्याही खेळाडूला संघातून वगळण्याआधी त्याला त्याची कल्पना द्यायला हवी. मी, युवराज, रैना, त्रिशतकवीर नायर.. आमच्यापैकी कोणालाही विश्वासात घेऊन काहीही सांगितलं गेलं नाही. ते तर राहू दे. ज्या अंबाती रायडूला सलग दोन वर्षे तुम्ही संघात चौथ्या क्रमांकासाठी खेळवले, त्याला विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर तुम्ही संघातून वगळले. आणि आम्हाला 3डी खेळाडू हवा असं कारण देऊन त्याच्या जागी तुम्ही विजय शंकरला संघात घेतलेत. विश्वचषक स्पर्धेच्या संघनिवडीबद्दल बोलताना कोणता निवड समिती अध्यक्ष असं करतो? असे वागणे शोभते का?’’, असा रोखठोक सवाल गंभीरने प्रसाद यांना केला.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या