26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeलस घेतल्यानंतर २६ हजार जणांवर गंभीर साईड इफेक्ट

लस घेतल्यानंतर २६ हजार जणांवर गंभीर साईड इफेक्ट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. याचदरम्यान सरकारी माहितीच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार देशात लसीकरणामुळे आतापर्यंत ४८८ जणांचा मृत्यू झाला, तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत.

वैज्ञानिक भाषेमध्ये अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्टस्ला ऍडव्हर्स इव्हेंट फॉलोइंगी इम्यूनायझेशन म्हणजेच एईएफआय असे म्हटले जाते. लसीकरण मोहीम हाती घेणा-या प्रत्येक देशात अशा प्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. भविष्यात लसीकरणाचा दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावा, यासाठी ही आकडेवारी गोळा केली जाते. ही आकडेवारी १६ जानेवारी ते ७ जून दरम्यानची आहे, असेही सांगण्यात आले.

ही आकडेवारी पाहिल्यास लसीकरणामुळे मृत्यू झालेल्याचे प्रमाण फारच कमी आहे. देशात ७ जूनपर्यंत २३ कोटी ५० लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. या कालावधीत एईएफआयची एकूण २६ हजार २०० प्रकरणे समोर आली आहेत. याचे प्रमाण केवळ ०.०१ टक्के आहे. अर्थात, १४३ दिवसांच्या कालावधीत लस घेणा-या प्रत्येक १० हजार जणांमागे केवळ एका व्यक्तीला लसींचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत, तर लस घेणा-या प्रत्येक १० लाख लोकांमागे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

आजपासून शाळांची ऑनलाईन घंटा वाजणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या