20.8 C
Latur
Friday, December 4, 2020
Home आंतरराष्ट्रीय सीरमचा पुढाकार : नाकातून द्यावयाच्या लसीचे भारतात उत्पादन!

सीरमचा पुढाकार : नाकातून द्यावयाच्या लसीचे भारतात उत्पादन!

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या देशांत लस विकसित केली जात आहे. काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे, तर इंजेक्शनशिवाय लस देण्यासाठीचा पर्याय शोधण्यात येत आहे. त्यासाठी नाकावाटेही लस देण्यात येणार आहे. अमेरिकेतील कोडाजेन्सिक्स या कंपनीने अशी लस तयार केली आहे. या लसीचे भारतात उत्पादन होणार असून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट लसीचे उत्पादन करणार आहे.

अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स या कंपनीे नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस तयार करीत आहे. सीडीएक्स-००५ असे या लसीचे नाव आहे. या लसीत पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे. कोडाजेन्सिक्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लसीचे भारतात उत्पादनाला करायला सीरम इन्स्टिट्यूटला परवानगी मिळाली आहे. भारताच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या रिव्  कमिटी ऑफ जेनेटिक मॅनिप्युलेशनने ही परवानगी दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. अमेरिकेतील कोडाजेन्सिक्स कंपनी इंजेक्शनऐवजी नाकावाटे देण्यात येणारी लस तयार करीत आहे.

या लसीची प्री-क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. प्राण्यांना लस देण्यात आल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यानंतर आता मानवी चाचणीसाठीही कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या वर्षाखेरपासून या लसीची ब्रिटनमध्ये मानवी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूटला लस उत्पादित करण्यासाठी भारताने परवानगी दिली असल्याचे कोडाजेन्सिक्सने म्हटले आहे. ही लस इंजेक्शनपेक्षाही अधिक प्रभावी ठरणार असून, नाकाद्वारे लस देण्यात येणार असल्याने रुग्णांना काळजीची आवश्यकता नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

सिरम इन्स्टिट्यूट सध्या ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या लसीचे उत्पादन करत आहेत. सध्या ऑक्सफर्डच्या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लस विकसित झाल्याची घोषणा झाल्यानंतर लस वितरणाची तयारी करण्यात येणार आहे. त्यातच आता नाकावाटे देण्यात येणा-या लसीचे उत्पादनही सीरम इन्स्टिट्यूट करणार आहे. त्यामुळे भारतात या दोन्ही लस उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ही लस तयार करणारी जगातील मोठी कंपनी असल्याने याचा फायदा भारताला होऊ शकतो.

जगभरात १५० लसींची चाचणी
जगभरात जवळपास १५० लसींची चाचणी सुरू आहे. यामधील ३८ लसींची मानवी चाचणी सुरू आहे. मॉडर्ना, फायजर, अ‍ॅस्ट्राजेनका, सिनोवॅक आदी जवळपास आठ लसींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. चीनने नोव्हेंबरमध्ये लस उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली आहे, तर रशियानेदेखील सामान्य जणांना लस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

मशीनद्वारे दिल्या जाणा-या लसीची ऑस्ट्रेलियात चाचणी
ऑस्ट्रेलियात शास्त्रज्ञांनी सुईशिवाय कोरोनाची लस तयार केली आहे. आता या लसीची चाचणी सुरू होईल. ही लस डीएनएवर आधारित आहे आणि त्याच्या चाचणीसाठी १५० लोकांनी त्यांची नावे पाठवली आहेत. सिडनी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी तयार केलेली ही कोरोना लस एअर जेट मशीनद्वारे रुग्णांच्या त्वचेवर टोचली जाईल. हे डिव्हाइस फार्माजेट म्हणून ओळखले जाते. डॉक्टर गिन्नी मॅनसबर्ग यांची टीम ही लस तयार करत आहे. फार्माजेटद्वारे दिलेली लस इंजेक्शनपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते, असे मॅनसबर्ग यांचे म्हणणे आहे.

शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला पायलट

ताज्या बातम्या

कोरोनामुळे विमान क्षेत्राला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली : सध्या कोरोना महासाथीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. परंतु सर्वाधिक फटका हा विमान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला बसल्याचे दिसत आहे. क्रेडिट...

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे अत्याचार

अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

आणखीन बातम्या

कोरोनामुळे विमान क्षेत्राला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली : सध्या कोरोना महासाथीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. परंतु सर्वाधिक फटका हा विमान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला बसल्याचे दिसत आहे. क्रेडिट...

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...