34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeमहाराष्ट्रवयाच्या सत्तरीत जोडपे विवाहबंधनात

वयाच्या सत्तरीत जोडपे विवाहबंधनात

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जानकी वृद्धाश्रमात जीवन व्यतित करताना एक सहारा मिळाला आणि वृद्ध जोडपे विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना घडली. या वृद्ध जोडप्याला एकमेकांचा आधार मिळाल्याने त्यांच्या उर्वरित आयुष्यातील संसाराला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, ‘हम दो-हमारे दो’ वरून ‘हम दो-हमारा एक’ आणि फ्लॅट संस्कृतीने अनेक पोटच्या पोरांना जन्मदाते नकोसे झाल्याने आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक मातापित्यांना वृद्धाश्रमात मृत्यूची वाट पाहत दिवस घालवावे लागतात. महानगरांपासून ते छोट्या शहरापर्यंत ते गावापर्यंत गेल्या काही दिवसांपासून हेच चित्र दिसून येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील दोन समदु:खी वृध्द वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रमचालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुमधडाक्यात लग्न लावून दिले.

अनुसया शिंदे (वय ७०, मूळ रा. वाघोली, जि. पुणे) हे वृध्द नववधूचे तर वराचे बाबूराव पाटील (वय ७५, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून घोसरवाड येथील ‘जानकी’ वृद्धाश्रमात राहतात. दोघांच्याही साथीदारांचे निधन झाले आहे. त्यामुळे या समदु:खी वृध्दांनी एकमेकांच्या आयुष्यातील दु:खाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या