हिमायतनगर प्रतिनिधी :
तालुक्यातील मौजे नविन आंदेगाव येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने नागरिकांना दुर वरून पिण्याचे पाणी अनन्या साठी तारेवरची कसरत करावी लागत आहे या बाबी कडे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र लक्ष देत नसल्याचा आरोपी ग्रामस्थांनी केला आहे.
या परिसरातील विहिरी, तलाव,बोर बंद पडल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. येथील ग्रामपंचायत सरपंच , उप सरपंच व ग्रामसेवकानी टंचाईग्रस्त नागरिकांना तात्पुरती टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल आंदेगावकर यांनी व्यक्त केली आहे .
हिमायतनगर तालुक्यातील नवीन आंदेगाव या गावची लोकसंख्या अंदाजे ३ हजार च्या जवळ जवळ असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा पाण्याचा भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने येथील पाण्याचे बहुतांश स्त्रोत उन्हाळ्यात आटून जातात त्यामुळे येथील गावक-यांना पाणी विकत घावे लागत आहे .
या परिसरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी या गावांतील लहान थोर मंडळी वणवण फिरत आहेत. या परिसरात असलेल्या आजूबाजूच्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा पोहचू लागल्याने संतप्त झालेल्या गावक-यांना आता तरी कायमस्वरूपी नळयोजनेची गरज आहे ती गरज ंिहगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटीलकिंव्हा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडून मिळावी अशी अपेक्षा नवीन आंदेगाव येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.