19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये एसएफआची दादागीरी; कार्यालयात घुसून प्राचार्यांना धमकी

केरळमध्ये एसएफआची दादागीरी; कार्यालयात घुसून प्राचार्यांना धमकी

एकमत ऑनलाईन

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) कार्यकर्त्यांनी बुधवारी दादागिरीची मर्यादा ओलांडली.
एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी चक्क महाविद्यालय प्राचार्याच्या कार्यालयात घुसून धमकावल्याची घटना समोर आली आहे. प्राचार्यांनी एका विद्यार्थ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
विशेष म्हणजे ही दादागिरी सुरू असताना पोलिस शेजारीच उभे होते. पण ते शांतपणे पाहत आहेत. काही वेळाने सर्व कार्यकर्ते निघून गेले.

स्टाफसमोर प्राचार्यांशी गैरवर्तन
केरळच्या त्रिशूर महाराजा टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली. एका विद्यार्थ्याशी कथित गैरवर्तन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्याला कार्यालयाबाहेर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट विद्यार्थी शाखा एसएफआयचे कार्यकर्ते निषेध करत होते. प्राचार्य कक्षा बाहेर न आल्याने कार्यकर्ते कार्यालयात घुसून दमदाटी करत होते.

६ जणांवर गुन्हा दाखल

प्राचार्य पी. दिलीप यांनी मंगळवारी तक्रार नोंदवून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी एसएफआयच्या त्रिशूर जिल्हा सचिवासह ६ जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या