23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनशाहरूख खानचा पडद्यावर सिक्सर

शाहरूख खानचा पडद्यावर सिक्सर

एकमत ऑनलाईन

मुंबई: बॉलिवूडचा बादशहा, किंग खान अशी ओळख कमावलेल्या शाहरूख खान गेल्या चार वर्षात एकाही सिनेमात दिसलेला नाही. त्याच्या चाहत्यांना त्याला पडदयावर पाहण्याची खूप उत्सुकता आहे, पण शाहरूखचा नवा सिनेमा रिलीज होण्याचं नावच घेत नव्हता. आता मात्र शाहरूखने त्याच्या चाहत्यांसाठी धमाकेदार ट्रीट आणली आहे. येत्या १ जुलैपासून पुढच्यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत शाहरूख पडद्यावर सिक्सर मारण्यासाठी सज्ज झाला आहे.

त्याचे एक दोन नव्हे तर सहा सिनेमे प्रदर्शित होणार असून त्यात शाहरूख खान वेगवेगळया भूमिकांमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे २०१८ साली प्रदर्शित झालेल्या झिरो या सिनेमात शाहरूख दिसला होता. हा सिनेमा फ्लॉप झाल्याने शाहरूखलाही आता एका हिटची गरज आहे.

रॉकेट्री द नांबी इफेफ्ट
आर. माधवन याचा रॉकेट्री द नांबी इफेक्ट हा सिनेमा चर्चेत आहे. आता शाहरूखमुळेही या सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा येत्या १ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. इस्त्रोचे वैमानिक आणि भारतीय अभियंता नंबी नारायण यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतला आहे.

ब्रम्हास्त्र
रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या केमिस्ट्रीमुळे गेल्या पाच वर्षापासून जोरदार चर्चा असलेला ब्रम्हास्त्र सिनेमा येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील कलाकारांच्या यादीत शाहरूख खान या नावाने लक्ष वेधलं आहे.

पठाण
शाहरूखचा नवा सिनेमा कधी येणार या चर्चेत सर्वाधिक नाव होतं ते म्हणजे पठाण या सिनेमाचं. अ‍ॅक्शन आणि थ्रिलर असा हा सिनेमा शाहरूखच्या नावावर चालेल असा दावा केला जात आहे २०२३ च्या २५ जानेवारीला पठाण पडदयावर येणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत.

जवान
जवान या सिनेमातूनही पुढच्यावर्षी शाहरूख खान त्याच्या चाहत्यांना दर्शन देणार आहे. जोरदार अ‍ॅक्शनपट असलेल्या सिनेमातील शाहरूखचा डॅशिंग लुक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पुढच्यावर्षी २ जूनला सिनेमा पडदयावर येणार असून एकाच वेळी कन्नड, तामिळ, तेलुगू या भाषांमध्ये जवान सिनेमा रिलीज होणार आहे.

डंकी
पठाण या सिनेमाने शाहरूख पुढच्यावर्षीची सुरूवात करणार आहे तर डंकी या शाहरूखच्या सिनेमाने वर्षाच्या अखेरीलाही बादशहाच्या चाहत्यांना पर्वणी मिळणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी सिनेमा २२ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नूसोबत शाहरूख या सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या