26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeशहाजी बापूंचे मंत्रिपद ओक्केमध्येच..! सदाभाऊ खोतांची भर सभेत घोषणा

शहाजी बापूंचे मंत्रिपद ओक्केमध्येच..! सदाभाऊ खोतांची भर सभेत घोषणा

एकमत ऑनलाईन

सांगली : शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या भूमिकेनंतर आता राज्यात सत्तांतर होऊन शिंदे सरकारची स्थापनाही झाली आहे. सरकार कामालाही लागले आहे पण सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांच्या त्या डायलॉगची क्रेझ आजही कायम आहे.

या डायलॉगमुळे मराठी भाषा ही सातासमुद्रापार गेली असून आता शहाजी बापूंना मंत्रिपदही मिळणार असल्याचा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. शिवाय गुवाहाटी ते गोवा प्रवास आणि त्यानंतर कोसळलेले सरकार यावरूनही या दोघांमध्ये जुगलबंदी रंगली होती.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सदाभाऊ खोत आणि शहाजी पाटील हे दोघेही एकत्र आले होते. यावेळी गुवाहाटीमधील किस्से आणि सध्या राज्य सरकारने घेतलेले निर्णय कसे हिताचे आहेत हे देखील शहाजी बापू पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी पटवून सांगितले.

सदाभाऊंनी व्यक्त केली इच्छा
मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडलेला असला तरी याबाबत अनेकजण इच्छुक आहेत. याबाबत सदाभाऊ खोत यांनी यापूर्वीही आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. तर क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे.

शिवाय शहाजी बापू पाटलांचे तर मंत्रिपद ओक्केच असल्याचे सदाभाऊ यांनी सांगितले. मात्र, तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यानंतर आमचाही विचार करा असा टोलाही त्यांनी लगावला. यापूर्वीही सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपदाबाबत आपण इच्छुक आहोतच पण ग्रामीण भागाशी निगडीत पद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

दोघेच कारभारी पण विकास कामांचा धडाका
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सरकार चालवत आहेत. दोन माणसांवर चांगले काम सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.दोन वाढपे व्यवस्थित वाढत असतील तर ४०जणांची काय गरज आहे, असा विनोदही खोत यांनी केला. सत्तेवर नसल्यावर लय वाईट परिस्थिती असते.

सरकार असताना घरासमोर माणसांची १ किलोमीटर सकाळी सकाळी रांग असायची. सत्ता गेल्यावर मात्र सगळी गर्दी गायब झाली, असेही खोत म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या