22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रशहाजीराजे, जिजामाता हेच शिवाजी महाराजांचे खरे गुरू

शहाजीराजे, जिजामाता हेच शिवाजी महाराजांचे खरे गुरू

एकमत ऑनलाईन

पुणे : कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ हेच आहेत, असे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समोरच ठणकावून सांगितले. राज्यपालांनी स्वामी समर्थ हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला अनुसरूनच कोल्हे यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण, हे जाहीरपणे सांगितले.

पुण्याच्या खेडमध्ये हुतात्मा राजगुरूंच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात कोल्हे बोलत होते. त्यानंतर बोलताना राज्यपालांनी कोल्हेंच्या वक्तव्यावर भाष्य करणे टाळले. मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे म्हणणे हे एकतर्फी राहील. कारण दुसरीकडे हुतात्मा राजगुरूंप्रमाणे अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले हे विसरून चालणार नाही. याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले.

राज्यातील सध्याचे सरकार हे राज्यपालांच्या ऐकण्यातले आहे. त्यामुळे हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी मदत करा, असे आदेश ते या सरकारला देतील, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहितेंनी केली. याला प्रतिउत्तर देताना तुमचे नामदार हे कामदार आहेत. मात्र फक्त नामाचा तर मी आहे, राज्यपालांकडे तर काहीच नसते. असे मिश्कीलपणे नमूद केले, पण पुढे बोलताना स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले.

भारताला मी हनुमानाप्रमाणे समजतो. भारत हा माझा हनुमान आहे. जसे हनुमानाला पर्वत उचलणे शक्य वाटत नव्हते मात्र त्यांच्यात विश्वास निर्माण केल्यावर हनुमानाने थेट पर्वत उचलून आणले. तसाच आपला भारत आहे. बलाढ्य आहे. मात्र कोणीतरी तो आत्मविश्वास भारताला देण्याची गरज आहे, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या