28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरउदगीर जिल्हानिर्मितीचा निर्णय शरद पवार घेऊ शकतात

उदगीर जिल्हानिर्मितीचा निर्णय शरद पवार घेऊ शकतात

एकमत ऑनलाईन

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली अपेक्षा
उदगीर : उदगीर जिल्हा व्हावा, अशी मागणी या संमेलनाच्या मंचावरुन होत आहे. त्यास पालकमंत्री या नात्याने माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या सर्वांचे आदरणीय नेते शरद पवार यांचा आवाका मोठा आहे. सर्वांना विश्वासात घेऊन बीड, नांदेड, लातूर या जिल्ह्याच्या योगदानातून नवीन उदगीर जिल्हा निर्मितीसाठी ते पुढाकार घेतील, अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती याचे जवळचे नाते आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि आपल्या संस्कृतीचे जतन करावे. म्हणून सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यभरात सांस्कृतिक केंद्र उभारले जातील. त्यासाठी हे संमेलन मार्गदर्शन करेल, अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. संमेलनात आयोजित विविध परिसंवादात विचारमंथन होऊन अनेक ठराव पारित केले जातात. ते नेहमीच राज्य शासनाला मार्गदर्शक ठरतात. उदगीरच्या संमेलनातही राज्याच्या कारभाराला दिशादर्शक ठरवणारे ठराव पारित होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या