20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रशरद पवारांना आजही डिस्चार्ज नाही; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

शरद पवारांना आजही डिस्चार्ज नाही; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती सोमवारी ३१ ऑक्टोबरला समोर आली होती. यानंतर शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. २ किंवा ३ नोव्हेंबरला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे समोर आले होते. मात्र, आता आजही शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नसल्याचे समोर आले आहे.

शरद पवार यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवार यांना पूर्णपणे बरं होण्यास आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे, असे डॉक्टर म्हणाले. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. त्यांनी असे म्हटले होते की, २ नोव्हेंबरला संध्याकाळी शरद पवार यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर ३ तारखेला शरद पवार हे शिर्डी येथील नियोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

४ ते ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी करू नये, अशी विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. मात्र, आता शरद पवार यांना बरे होण्यास आणखी एक-दोन दिवस लागणार असल्याने त्यांचा शिर्डी दौराही रद्द झाला आहे.

शरद पवार अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आणखी एक -दोन दिवस पूर्णपणे बरं होण्यासाठी लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे ते उद्यापासून सुरू होणा-या राष्ट्रवादीच्या शिबिरालाही उपस्थित राहू शकणार नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या