23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रशरद पवार म्हणजे ‘शकुनी काका’ ; पडळकरांचा हल्लाबोल

शरद पवार म्हणजे ‘शकुनी काका’ ; पडळकरांचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा राष्ट्रवादी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यानंतर एसटी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकरांनी आणखी एकदा शरद पवारांवर टीका केली आहे.
शरद पवारांचा ‘शकुनी काका’ असा उल्लेख करत गोपीचंद पडळकरांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवारांचा कोटींची बँक व बँकेची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटींची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. बँकेची निवडणूक तर घोषित केली आहे पण जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढला, अशी टीकाही पडळकरांनी केली.

दरम्यान, एसटी कामगार उपाशी उघड्यावर लढा देत होते. मात्र, त्यावेळेस संघटनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातर आपल्या ‘सिल्व्हर ओक’वरून एकवेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी पण पाठवलं नाही, असा टोला देखील पडळकरांनी लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या