16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रशरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत

शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत. शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे. शरद पवार जरी सहभागी होणार नसले तरी इतर काही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सहभागी होणार नाहीत.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. या यात्रेसाठी काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसकडून माहिती देण्यात आली होती.

परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सहभागी होणार नाहीत. शरद पवार सहभागी होणार नसले तरी राष्ट्रवादीकडून दिग्गजांची फळी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे बुलडाणा येथे आणि हिंगोली येथे रोहित पवार सहभागी होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या