35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रशरद पवार यांचा आजपासून मराठवाडा दौरा

शरद पवार यांचा आजपासून मराठवाडा दौरा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आणि शेतकºयाला आधार देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी शरद पवार हे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.

शरद पवार हे उद्यापासून दौ-यावर असणार आहेत. यावेळी ते तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद भागात पाहणी करणार आहेत. ते १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस दौरा करणार आहेत. महाराष्ट्रावर कोरोना महामारीचे संकट आहे. त्यातच आता अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले आहे. राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि वादळी पाऊस झाल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस, कापूस, तांदूळ, सोयाबीनची पीके हातातोंडाशी आली असताना अतिवृष्टीमुळे ती वाहून गेली.

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शुक्रवारी अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील बळीराज्याला वाºयावर न सोडता लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांकडून करण्यात येत आहे.

बंगळुरात ऑनर किलिंग : वडील व चुलत भावांकडून मुलीची हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या