22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयपतीला दुस-या महिलेसोबत शेअर करणे भारतीय महिलांना अमान्य : हायकोर्ट

पतीला दुस-या महिलेसोबत शेअर करणे भारतीय महिलांना अमान्य : हायकोर्ट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय महिला आपल्या पतीबाबत अत्यंत संवेदनशील आणि मालकी हक्क दाखवणा-या असतात. त्यामुळे आपला पतीला इतर महिलांसोबत शेअर करणे हे त्या सहन करू शकत नाहीत, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवत याचिकाकर्ता (पती) सुशील कुमार आणि इतर सहा जणांची याचिका फेटाळून लावली.

पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तसेच पतीने आधीच दुस-या महिलेशी लग्न केले होते. या लग्नातून त्याला दोन मुले देखील आहेत. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तिच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर छळ करण्यात आला, असे सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वाराणसी जिल्ह्यातील मदुआडीह पोलिस ठाण्यात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. त्याने जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती.

सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. पतीने २०१८ मध्ये तिसरे लग्न केले. पत्नीच्या आत्महत्येमागे हे प्रमुख कारण असल्याचे समजते. आरोपींवर खटला चालवण्यासाठी पुरेशी माहिती असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच भारतीय महिला आपल्या पतींबाबत अतिशय संवेदनशील असतात. आपल्या पतीने दुस-या महिलेशी लग्न केले आहे किंवा आपल्या पतीचे दुस-या महिलेसोबत संबंध आहे, हे कोणत्याही महिलेसाठी धक्कादायक असेल, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या