22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे उद्या पुन्हा दिल्ली दरबारी

शिंदे उद्या पुन्हा दिल्ली दरबारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकीकडे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौ-यावर जाणार आहेत. या दौ-या दरम्यान शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदेंसोबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हेदेखील दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे या दौ-यात नेमकी काय खलबतं शिजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिल्ली दौ-यासाठी शिंदे आणि इतर दोन मंत्री उद्या दुपारी दिल्लीत दाखल होणार असून, या दौ-यादरम्यान ते गडकरी आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज्यातील अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या तीन मंत्र्यांशिवाय संदीपान भुमरेदेखील दिल्लीला जाणार आहेत.

राज्याच्या विकासासाठी केंद्रातर्फे जी आवश्यक मदत हवी आहे, त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण नुकताच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर येथून पुढे राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा प्रकल्प राज्यातून बाहेर जाऊ देण्यास इच्छूक नसल्याचे दिसून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या