23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा; वेदांता-फॉक्सकॉनवर काढणार तोडगा?

शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा; वेदांता-फॉक्सकॉनवर काढणार तोडगा?

एकमत ऑनलाईन

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यात विरोधक आणि शिंदे-फडणवीस सरकारवर सर्वच स्तरांतून जोरदार टीका केली जात आहे. यावरून वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या भेटीदरम्यान या सर्व वादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाऊ शकते. हा प्रकल्प राज्यातच रहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील हे देखील मोदींना या भेटीदरम्यान पटवून देण्याचा या तीनही मंत्र्यांचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन दिल्याचे शिंदे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी यापेक्षा मोठा प्रकल्प केंद्र सरकार काय देणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यात आता वेदांता-फॉक्सकॉनवर तोडगा काढण्यासाठी शिंदे, राणे आणि फडणवीस दिल्लीत जाऊन मोदींशी प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
……………

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या