27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील शिंदे सरकार ‘विषारी झाडाचे फळ’

महाराष्ट्रातील शिंदे सरकार ‘विषारी झाडाचे फळ’

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार हे ‘विषारी झाडाचे फळ’ असल्याचे म्हटले आहे. फ्लोअर टेस्ट आणि नवीन मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची नियुक्ती यासह सर्व घटना ‘विषारी झाडाची फळे’ आहेत. त्याची बीजे बंडखोर आमदारांनी पेरली, असा आरोप करण्यात आला आहे.

शिंदे गटाच्या आमदारांनी घटनात्मक पाप केले
शिंदे गटाच्या आमदारांनी घटनात्मक पाप केले आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार नापाक हातांनी सुप्रीम कोर्टात पोहोचल्याचे सांगितले. त्यांनी उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाबाबत चुकीचे विधान केले. पक्षविरोधी कारवाया लपवण्यासाठी बंडखोर आमदारांनी ‘खरी सेना’ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली, बंडखोर आमदारांना महाराष्ट्र सोडून भाजपशासित गुजरात राज्यात का जावे लागले हे समजत नाही.

पुढे आसाममध्ये भाजपच्या मांडीवर बसावे लागले. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचा पांिठबा होता, तर असे का झाले? गुजरात आणि आसाममध्ये शिवसेनेचा एकही केडर नव्हता हे वेगळे सांगायची गरज नाही. आमदारांना संपूर्ण साधनसामग्री पुरविणारा भाजपचाच कार्यकर्ता होता.

अडीच वर्षे मंत्री राहिले, आक्षेप कधीच घेतला नाही
त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शिवसेनेसोबतच्या युतीमुळे त्यांच्या मतदारांमध्ये नाराजी असल्याचे पक्षविरोधी कारवायांचे समर्थन करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी खोटे आख्यान रचल्याचे ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले. वास्तविकता अशी आहे की, हे आमदार महाविकास आघाडीत अडीच वर्षे मंत्री राहिले, मात्र त्यांनी कधीच आक्षेप घेतला नाही.

ज्यांना ते शिवसेनेचा जुना मित्रपक्ष (भाजप) सांगत आहेत, त्यांनी शिवसेनेला कधीही बरोबरीचा दर्जा दिला नाही. दुसरीकडे मात्र, शिवसेनेच्या नेत्याला महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद मिळाले.

नाराजी असती तर पहिल्या दिवसापासून मंत्रिमंडळात सामील नसते
सरकार सत्तेवर आल्यापासून या आमदारांनी नेहमीच त्याचा गैरफायदा घेतला, असेही बोलले जात आहे. यापूर्वी कधीही त्यांनी मतदार/कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित केला नाही. या सरकारचा भाग असल्याबद्दल ते इतके नाराज असते तर पहिल्या दिवसापासून ते मंत्रिमंडळात सामील झाले नसते, असाही मुद्दा प्रतिज्ञापत्रात उपस्थित करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या