22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यपाल नियुक्त आमदारांची यादी शिंदे सरकारने मागे घेतली; ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा धक्का

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी शिंदे सरकारने मागे घेतली; ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा धक्का

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ही यादी मागे घेत असल्याचे पत्र दिले आहे.

१२ नोव्हेंबर २०२० मध्ये ठाकरे सरकारने १२ नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वादही समोर आले होते. मात्र दरम्यानच्या काळात सरकार बदलल्यानंतर आता ही यादीच मागे घेण्याचं पत्र शिंदे सरकारने दिले आहे.

या १२ जणांची नावे दिली होती…
महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी चार-चार अशी १२ जणांची नावं राज्यपाल नियुक्त आमदारीसाठी पाठवण्यात आली होती. यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांचे नाव होते तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांचं नाव देण्यात आले होते. तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटील यांचे नाव पाठवण्यात आले होतं. यापैकी एकनाथ खडसे यांची विधानपरिषेदत एन्ट्री झाली आहे तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे.

१२ नावे लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार?
शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपाल नियुक्त १२ नावे लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. या नावांवर अंतिम चर्चाही झाली असल्याची माहिती आहे. शिंदे-फडणवीसांकडे १२ नावांसाठी कितीतरी पटीने इच्छुकांची संख्या आहे. या १२ नावांसाठी अनेक नेत्यांनी लॉबिंग देखील सुरु केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या