27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी शिंदे गट निवडतोय मनसेचा पर्याय?

अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी शिंदे गट निवडतोय मनसेचा पर्याय?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतून बंड करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची टांगती तलवार आहे. यापासून वाचण्यासाठी शिंदे गटाला इतर पक्षात विलीन व्हावे लागणार आहे. यात आधी भाजप आणि प्रहार या दोन पक्षांचा पर्याय त्यांच्या समोर होता. आता त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय देखील असल्याचं सांगितलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून पर्यायांची चाचपणी सुरू आहे. जर शिंदे गट विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेमध्येही हा गट सामील होऊ शकतो. विलीनीकरणासाठी शिंदे मनसेकडे प्रमुख पर्याय म्हणून बघत असल्याचं सांगण्यात येत आहेत. यामागे कारण सांगण्यात येत आहे की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी वारंवार सागितलं आहे की, ते हिंदुत्वासाठी वेगळे होते आहेत. त्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. यातच अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे, ती बाळासाहेब ठाकरेंच्या पद्धतीची आहे. यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसे ही ऑफर स्वीकारू शकते का?
याबाबत मनसेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेकडे असा कोणताही पर्याय आल्यास, मनसे ही ऑफर स्वीकारेल, तसेच शिंदे गटाचे मनसेत विलानीकरण होऊ शकतं. याआधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या एकमेव आमदाराचे मत भाजपकडे गेले होते. कारण हे दोन्ही पक्ष समविचारी आहेत. अशातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या