29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या

शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

पुणे : शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. निलेश माझिरे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले होते, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र गुरुवारी दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्रथामिक अंदाज वर्तविला जात आहे.

शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. निलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या