27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडण्यात यशस्वी : शरद पवार

शिंदे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडण्यात यशस्वी : शरद पवार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडी या लढाईत कमी पडली नसून शिंदे हे आमदारांना घेऊन बाहेर राहण्यात प्रभावी ठरले. ४० आमदार बाहेर राहतात ही साधी गोष्ट नाही. ती कुवत शिंदे यांनी दाखवली यातच त्यांचे यश आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं आहे.

शिवेसेनेचे जे आमदार आसाममध्ये गेले त्यांची नेतृत्व बदलाची मागणी होती. भाजपमध्ये दिल्ली किंवा नागपूरच्या आदेशात तडजोड नसते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, याची कल्पना कुणालाही नव्हती, असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलं आहे. आज शपथविधीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचं उदाहरण दिलं आहे.

यावेळी पवार म्हणाले की, गुवाहाटी, सुरत आणि महाराष्ट्र या घटनेते तीन ते चार गोष्टी आहेत. आसाममध्ये सेनेचे जे सहकारी गेले त्यांची शिंदे उपमुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा होती. मात्र भाजपकडून आदेश आला असून त्यानुसार निर्णय झाला आहे. भाजपात केंद्रातून किंवा नागपूरवरुन आदेश आला की त्याचे पालन करावे लागते. शिंदे यांना मुख्यमंत्री करणार आहेत याची कल्पना त्यांनाही नव्हती, असंही पवार म्हणाले आहेत. कार्यपद्धतीत एकदा आदेश दिल्यानंतर त्याचे तंतोतत पालन करावे लागते, ही भाजपाची रणनीती आहे.

पुढे ते म्हणाले की, पहिले मुख्यंमंत्री साताऱ्याचे होते. पृथ्वीराच चव्हाण आणि आता एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आता जबाबदारी पडली आहे. शपथ घेणार व्यक्ती राज्याचा प्रतिनिधी असतो तो राज्याचा प्रमुख होतो. त्याला राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवावे लागतात. त्यामुळं एकनाथ शिंदेंना मी शुभेच्छा देतो, असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या