16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे - ठाकरे वाद चिघळणार; नवी चिन्हेसुद्धा सारखीच!

शिंदे – ठाकरे वाद चिघळणार; नवी चिन्हेसुद्धा सारखीच!

एकमत ऑनलाईन

मुंबई: शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातली लढाई निवडणूक आयोगात पोहोचली. त्यानंतर आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नावच गोठवलं आणि दोन्ही गटांना नवी नावं आणि चिन्हं सादर करण्याचे आदेश दिले. आता या नव्या चिन्हांवरुन पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आज दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडे चिन्हे आणि नावे सादर करण्याची शेवटची मुदत होती. त्याप्रमाणे दोन्ही गटांनी आपली चिन्हं आणि नावं सादर केली आहे. यामध्ये खूपच साम्य असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंनी मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही तीन चिन्हं सादर केली आहे. तर शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हे दिली आहेत. आता या दोन्हीत फक्त गदा आणि मशाल ही दोनच दोघांची वेगळी चिन्हे आहेत.

नावांमध्येही असंच साम्य आढळून आले आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नावे सांगितली होती. तर शिंदे गटही बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरण्याची शक्यता आहे. शिवाय शिंदे गटाकडून पक्षासाठी आनंद दिघेंचे नाव वापरण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. आता या साम्यामुळे दोन्ही गटात नवीन वाद निर्माण होईल का, अशीचिंता व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या