23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदेंनी घेतली लीलाधर डाकेंची भेट; संध्याकाळी मनोहर जोशींना भेटणार

शिंदेंनी घेतली लीलाधर डाकेंची भेट; संध्याकाळी मनोहर जोशींना भेटणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जुन्या शिवसैनिकांना भेटण्याचा सिलसिला अद्याप कायम आहे. काही दिवसांपूर्वी दोन वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर आता शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली.

डाके हे बाळासाहेब ठाकरेंपासूनचे कडवे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. यानंतर आता शिंदे मनोहर जोशींच्या भेटीला जाणार असून संध्याकाळी पाच वाजता ही भेट असेल.

एकनाथ शिंदेंच्या जुन्या नेत्यांच्या भेटीमागील प्रमुख कारण म्हणजे या नेत्यांना आपल्या बाजूने करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली होती. जेव्हा शिवसेनेच्या बारा खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला तेव्हा कीर्तिकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. या पार्श्वभूमीवर कीर्तिकर यांची भेट घेऊन शिंदे यांनी वेगळे वातावरण तयार करण्याचे काम केले होते.

आता ज्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत शिवसेना वाढवली त्या जुन्याजाणत्या ज्येष्ठ नेत्यांच्या एकनाथ शिंदे भेटी घेत आहेत. आम्ही अद्यापही जुन्या नेत्यांना विसरलेलो नाहीत, त्यांच्या गाठीभेटी घेत आहोत आणि त्यांची विचारपूसही करत आहोत, हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या