23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयशिंदे विरुध्द ठाकरे : सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

शिंदे विरुध्द ठाकरे : सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपाच्या मदतीने राज्यात युतीचं सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यात अनेक घडमोडींना वेग आला आहे. बंडखोरीनंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकार आणि शिवसेनेच्या पुढील भवितव्याचा फैसला होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असून आता न्यायालयाच्या प्रत्येक घडामोडीकडे लक्ष लागले आहे..

महाराष्ट्रातील राजकीय संकटावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील छावणी आणि एकनाथ शिंदे छावणीच्या याचिकांवर सरन्यायाधीश एन.व्ही .रमण्णा यांच्या खंडपीठात सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीदरम्यान, वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव गटाची बाजू मांडताना सांगितले की, जर शिंदे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली तर निवडून आलेले प्रत्येक सरकार भविष्यात पाडले जाऊ शकते.

यावर शिंदे गटातून दुस-या पक्षात समील होणं म्हणजेच बंडखोरी असा शिंदे गटाकडून हरीश साळवींचा युक्तिवाद सुरू आहे. पुढे शिंदे गटाची बाजू मांडताना ते म्हणाले, एका मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर दुस-या मुख्यमंत्र्याने शपथ घेणे चुकीचे नाही. तसेच पक्षात आवाज उठवणे चुकीचे नाही. लक्ष्मणरेषा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवता येतो असे साळवी यांनी म्हटले आहे.

कारण शिंदे गटाकडून पहिल्या दिवसापासून आम्ही शिवसेनेविरोधात कोणतेही काम केलेले नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लक्ष्मणरेषा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवता येतो असे साळवी यांनी म्हटले आहे. २० आमदारांचा पाठिंबा न मिळालेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद बहाल करावं या कल्पनेत आपण आहात का? अशी विचारणा हरिश साळवे यांनी केली आहे.

एखाद्या पक्षाला नवा नेता हवा असेल तर त्यात काही गैर काय असे साळवींनी कोर्टात म्हटले आहे. फूट तेव्हाच मानली जाते जेव्हा तुम्ही दुस-या पक्षात जाता असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील साळवी यांनी केला आहे. तसेच पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी एखादी तक्रार असणे गरजेचे असल्याचेही साळवी यांनी बाजू मांडताना म्हटले आहे.

अपात्र आमदारांना पात्र ठरवावे : सिंघवी
ठाकरे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करत आहेत.सुनावणीदरम्यान, कपिल सिब्बल यांनी राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, अशाप्रकारे कोणतेही सरकार पाडले जाऊ शकते. याशिवाय सिब्बल यांनी शिंदे यांच्या शपथविधीवरही आक्षेप घेतला आहे. राज्यपाल यांनी सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना शपथविधीसाठी बोलावणे अयोग्य होते असेही त्यांनी कोर्टात म्हटले आहे.

बंडखोर योग्य तर उपाध्यक्षांचा निर्णय चुकीचा असं कसं होऊ शकतं, असा प्रश्नही सिंघवी यांनी उपस्थित केला आहे. शपथविधी कसा झाला? इथं घटनेची पायमल्ली झाली आहे.
गुवाहाटीला गेल्यावर शिंदे गटाने केलेला मेल हा अनधिकृत होता, असंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी सिंघवी यांच्याकडून रेबिया प्रकरणाचा दाखला देण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या