मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी आमदार एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावले होते. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का असे सरळ विचारले होते. मात्र, त्यांनी नाटक केल. अस झालं तसं झाल, हे ते सांगितले. शेवटी जे व्हायचे होते ते २० जून रोजी झाले. त्यांनी बंड केला, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सांताक्रुझमध्ये युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे बोलत होते. राज्यात सुरू असलेल्या घडामाडींवर बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावेळी शिंदेंनी अस झालं तसं झाले म्हटले होते. या फाईल थांबवल्या थांबवल्या, त्या फाईल थांबवल्या असे म्हटले होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मात्र, त्यांनी २० जून रोजी बंड पुकारला. त्यांनी बंड पुकारल्याने सर्व मान सन्मान गमावला. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, तो तुम्ही बघितलाच असेल. आज हा मेळावा गुवाहाटीतून बंड पुकारलेले आमदरा बघतच असले. ते म्हणत असेल किती गर्दी झाली आहे मेळाव्याला, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे. आता घाण साफ झाली आहे. फुटीरवादी लोकं शिवसेनेत नको आहे. त्यांना माफ केले जाणार नाही. बंडखोरीनंतर शिसेनेला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.