26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटालाही राजीनाम्याचे दु:ख ; सरकारे येतात आणि जातात

शिंदे गटालाही राजीनाम्याचे दु:ख ; सरकारे येतात आणि जातात

एकमत ऑनलाईन

मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंच्या बंडाचा उत्तरार्ध हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला.
बुधवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासह आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यामुळे आता भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोव्यात आज शिंदे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. यासंदर्भात बोलताना दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे आज मुंबईला येतील, असे सांगितले. तर, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांवरही नाराजी व्यक्त केली.

गोव्यात आज शिंदे गटाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाली. सरकारे येत असतात, जात असतात पण विचार महत्त्वाचा असतो. आम्ही शिवसेनेचेच आहोत, शिवसेना हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचा हा एक विचार आहे. त्यामुळे, आमचा वेगळा गट वगैरे नाही, असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली.

आमचे मंत्रिपदासाठी बंड असेल तर मग आमच्याकडे ६ मंत्री सोबत का आले हाही विचार व्हावा. आमचे बंड हे विचारधारेचे होते, असेही केसरकर यांनी म्हटले.
भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांवरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुणीतरी एका नेत्याने प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते, पण १०-१० नेते प्रतिक्रिया देत होते, हे कुठेतरी थांबले पाहिजे. या प्रतिक्रियांमुळे आम्ही दुखावले जाणारच, कारण आम्ही आमच्या नेत्याविरुद्ध बंड केले नव्हते, आमचे बंड राष्ट्रवादी-काँग्रेसविरुद्धचे होते, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पायउतार झाले याचे आम्हालाही दु:ख झाले. डोळ्यांत अश्रू आले, ते अश्रू दिखाव्याचे नाहीत. सत्ता स्थापन करत असताना कोणीतरी व्यक्तिगत का बोलावं. प्रत्येकाने भावनांची कदर ठेवली पाहिजे, आम्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतोच ना, असेही केसरकर यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या