23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्रअफवांवर विश्वास ठेवू नये; पवारांच्या भेटीसंदर्भात शिंदेंचा खुलासा

अफवांवर विश्वास ठेवू नये; पवारांच्या भेटीसंदर्भात शिंदेंचा खुलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काल मध्यरात्री भेट झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले होते.

मात्र, आता या बातमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत ‘कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये ’असा खुलासा केला आहे. त्यामुळे सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरद पवार साहेब यांच्यासोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या