18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअदानी पोर्टवर तीन देशांच्या जहाजांना प्रवेशबंदी

अदानी पोर्टवर तीन देशांच्या जहाजांना प्रवेशबंदी

एकमत ऑनलाईन

मुंबई : गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचे हेरॉईन ड्रग्ज सापडल्यानंतर अदानी समुहाने मोठा निर्णय घेतला असून, अदानींच्या बंदरांवर यापुढे इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील मालवाहू जहाजांना अदानी नियंत्रित बंदरांवर प्रवेशबंदी असेल. अदानी समुहाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून होणार आहे.

गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर १६ सप्टेंबर रोजी अंदाजे ३ हजार किलो वजनाचे हेरॉईन (ड्रग्ज) जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत २० हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. तालिबान आणि आयएसआयशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

अदानी समुहाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. १५ नोव्हेंबरपासून अदानींच्या बंदरांवर यापुढे इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील मालवाहू जहाजांना अदानी नियंत्रित बंदरांवर प्रवेशबंदी असेल.हा नियम अदानी समुहाकडून चालवल्या जाणा-या सर्व बंदरांना लागू असेल. पुढील नोटीस येईपर्यंत या तीन देशांमधून येणा-या जहाजांना अदानी पोर्टवर बंदी असेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या