23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रतुमच्या भांडणात शिवसैनिक मरतोय; बागुल यांचे शिंदेंना पत्राद्वारे भावनिक साद

तुमच्या भांडणात शिवसैनिक मरतोय; बागुल यांचे शिंदेंना पत्राद्वारे भावनिक साद

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील सत्तापेच चांगलाच वाढत असून या पार्श्वभूमीवर शिवसेना समर्थक आक्रमक तर झालेच आहेत. मात्र द्विधा मनस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर अनेकजण पत्राद्वारे शिवसैनिकांना पुन्हा एकत्र आणण्याचे काम करत आहेत. असेच एक पत्र नाशिकचे शिवसेना उपनेते सुनील बागुल यांनी बंडखोर एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना लिहले आहे.

‘माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब/ माननीय श्री केसरकर साहेब, गेल्या २१ तारखेपासून आम्ही तुमच्या दोन्ही नेत्यांच्या तोडून आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडणार नाही, आम्ही दिघे साहेबांची शिवसैनिक आहोत, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आहोत, आम्हाला राष्ट्रवादी आणि कॉग्रेस बरोबर सरकार नको तर आपण बीजेपी बरोबर सरकार स्थापन केले पाहिजे तसेच माननीय उद्धवजी साहेब म्हणाले, मी तयार आहे पण तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला जाऊन हे सांगत आहे. तुम्ही मला हे मुंबईत सांगू शकला असता तुमच्या तत्वाच्या आणि स्वाभिमानाच्या भांडणात शिवसैनिक मरतो आहे.

एक शिवसैनिक दुस-या शिवसैनिकाचा बोर्ड पाडतोय, काळे फास्तो, विरोधात घोषणा देतो. मोर्चा काढतो, तिरडी काढतो, शिवसैनिक हे शिवसेनेच्या विरोधात उभे राहून चॅलेंज करत आहे. शिवीगाळ करत आहे. आव्हान करत आहे आणि शक्ती प्रदर्शन करत आहे या सर्वामध्ये शिवसैनिकच मरतो आहे. शिवसैनिकाला दोन्ही बाजू सांभाळायच्या असतात. त्याला दोन्ही प्रिय आहे.

शिंदे साहेब मी दिघे साहेब आणि तुमचे सुद्धा काम बघितले आहे. तुम्ही अनेक अ‍ॅम्बुलन्स वाटप केलेले आहे. तुम्ही अनेकांना नोकरी लावलेली आहे. गरिबांसाठी तुम्ही जीव का प्राण आहे. शिवसेनेबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्याच्या कानफटीत लावण्याची ताकद तुमच्यात आहे. शिवसेना तुमची जीव की प्राण आहे. तुम्ही शिवसैनिकाला अनेक संकटातून बाहेर काढले आहे.

आज तुमच्या समोर शिवसेनेचे बॅनर फाडले जात आहे. शिवसेना कार्यालयाची तोडफोड होते याचे दु:ख तुम्हाला होऊन सुद्धा दाखवता येत नाही. ज्या शिवसेनेवर तुम्ही अति प्रेम केलं त्याची दुर्दशा तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी बघत आहे तसेच माननीय उद्धवजी ठाकरे यांना त्यांच्या छातीमध्ये ८ स्टेन आहे. त्यांच्या मानेची खूप मोठी सर्जरी झालेली आहे. त्यांना कोरोना झालेला आहे त्यांची तब्येत खूप खराब आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे अनेक आमदार आहेत आणि रोज एक एक आमदार येतो आहे हे सर्व बघितल्यानंतर मनाला खूप वेदना होत आहे. जी शिवसेना रात्र पहाट कडून वाढवली त्याची अशी दुर्दशा बघतांना मनाला खूप वेदना होतात. तुम्हाला शिवसेना पाहिजे.

उद्धवजींना तुम्ही पाहिजे आणि तुम्हाला बीजेपी पाहिजे याचा जर योग्य ताळमेळ झाला तर शिवसेना सुद्धा टिकेल तुम्हाला जनतेच्या कामासाठी बीजेपी हवी आहे तेसुद्धा साध्य करता येईल. परंतु इकडे तिकडे जाऊ नका. नको प्रहार, नको बीजेपी, नको मनसे आपण शिवसेनेतच आपला स्वाभिमान दाखवायचा. साहेब, शिवसेनेतच राहा, उद्धव साहेबांच्या बरोबरच राहा.

आम्ही राज्यस्तरावरील शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव साहेबांना विनंती करू, साकडे घालू आणि त्यांना तुमच्याबरोबर राहण्याची विनंती करू. तुम्ही सुद्धा साहेबांना एक मताने सांगा कि, साहेब झाले गेले विसरून जा आम्हाला समजून घ्या आणि महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी शिवसैनिक याला वाचवा, ही नम्र विनंती करतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या