21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रशेवटच्या क्षणापर्यंत शिवसैनिक; आमदार दादा भुसेंचे स्पष्टीकरण

शेवटच्या क्षणापर्यंत शिवसैनिक; आमदार दादा भुसेंचे स्पष्टीकरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : व्यक्तिगत पातळीवर स्वार्थासाठी व दबावापोटी बंडखोरीचा निर्णय घेतला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आशीर्वाद व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे एक शिवसैनिक ते कृषिमंत्री पदापर्यंतचा प्रवास करू शकलो, शेवटच्या क्षणापर्यंत शिवसैनिक म्हणून काम करीत राहीन.. अशा शब्दांत दादा भुसे यांनी आपले बंडखोरीबाबत मत मांडले.

राज्यातील सत्तानाट्यानंतर दादा भुसे पहिल्यांदाच मालेगावला आले होते. यावेळी त्यांनी समर्थकांशी संवाद साधला. मालेगाव येथील बालाजी लॉन्स येथे संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी समर्थकांशी संवाद साधत त्यांनी बंडखोरीमागील कहाणी सांगितली.

ते यावेळी म्हणाले की, ‘‘व्यक्तिगत पातळीवर स्वार्थासाठी व दबावापोटी बंडखोरीचा निर्णय घेतला नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आशीर्वाद व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे एक शिवसैनिक ते कृषिमंत्री पदापर्यंतचा प्रवास करू शकलो, शेवटच्या क्षणापर्यंत शिवसैनिक म्हणून काम करीत राहीन’’, असेही ते यावेळी म्हणाले.

तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कायमच आपले दैवत राहतील. मालेगावच्या विकासासाठी व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार दादा भुसे यांनी केले. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर दादा भुसे हे मंगळवारी मालेगावी दाखल झाले.

या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करताना दादा भुसे म्हणाले की शिवसेनेने मला भरभरून दिले आहे. निर्णय घेत असताना व्यक्तिगत पातळीवर दु:ख होत होते. कोणाच्या दबावापोटी निर्णय घेण्यात आला नाही. कोणाच्या विरोधात व बाजूला नसल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या