23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

एकमत ऑनलाईन

मातोश्रीसमोरून जाताना शिवसैनिक आक्रमक, रेकी करीत असल्याचा आरोप
मुंबई : राणा दाम्पत्यविरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. रात्री सव्वा ९ च्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. मोहित कंबोज शिवसैनिकांना डिवचण्यासाठी तिथे आले होते. तसेच मातोश्री परिसराची ते रेकी करत होते, त्यावेळी हा हल्ला झाल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

मातोश्री परिसरातून मोहित कंबोज यांची गाडी जात होती. सिग्नलला त्यांची गाडी थांबली होती. ५ मिनिटांपासून कुणाची तरी गाडी थांबली आहे, असा सेना कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी गाडीची पाहणी केली. त्यात त्यांना मोहित कंबोज दिसले. त्याक्षणी सेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला. एक लग्नसोहळा आवरून मी घरी जात होतो. कलानगरला एका सिग्नलवर माझी गाडी थांबली होती. त्यावेळी सेना कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. पोलिस आणि माझ्या सुरक्षा रक्षकांनी मला वाचवले. मी आता कलानगरमधून घराकडे निघालो आहे. पण राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला आहे. त्यांचा कायद्यावर विश्वास नाही का, असे मोहित कंबोज म्हणाले.

मातोश्रीची रेकी करत होते, या शिवसैनिकांच्या आरोपावर बोलताना मोहित कंबोज म्हणाले की, मी जर रेकी करत होतो, तर मुंबई पोलिस काय झोपले होते का? मी कसलीही रेकी करत नव्हतो. मी एका लग्नसमारंभाला गेलो होतो. समारंभ आटोपून मी घराकडे निघालेलो असताना शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला, असे मोहित कंबोज म्हणाले.

कंबोज हल्ल्याच्या तयारीत
मोहित कंबोज हे शिवसैनिकांवर हल्ल्याच्या पवित्र्यात होते, त्यांच्या गाडीत अ‍ॅसिड आणि हॉकी स्टिक्स असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला. मोहित कंबोज हे मातोश्री परिसरात रेकी करण्यासाठी आले होते, असाही आरोप त्यांनी केला.

फडणवीस संतापले
या हल्ल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. त्यांनी ट्विट करत आपला राग व्यक्त केला. तसेच मुंबई पोलिस आता हल्लेखोरांवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला. भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ उद्या मुंबई पोलिस आयुक्तांना भेटणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या