23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रगद्दार खासदार म्हणत संजय मंडलिकांविरोधात शिवसैनिकांचा मोर्चा

गद्दार खासदार म्हणत संजय मंडलिकांविरोधात शिवसैनिकांचा मोर्चा

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कोल्हापूरचे बंडखोर शिवसेना खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याच्या विरोधात कोल्हापुरात शिवसैनिकांनी आज मोर्चा काढला आहे.

संजय मंडलिक यांच्या घरावर मोर्चा नेला जाणार आहे. या मोर्चामध्ये बेन्टेक्स सोनं घातलेले संजय मंडलिक यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. मोर्चाच्या माध्यमातून खासदार संजय मंडलिक यांना जाब विचारण्यात येणार आहे.

बंडखोर खासदार संजय मंडलिक यांनी विशेष म्हणजे शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढला होता. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगत गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते २४ कॅरेट सोने असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांनीच बंडखोरी केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

त्यांनी गद्दारी केल्याचा आरोप करत जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आज त्यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे.
त्यांनी केलेली चूक सुधारली नाही, तर त्यांचा दोन लाख मतांनी पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. मोर्चामध्ये संजय मंडलिक यांचे बेंटेक्स घातलेले फलक मोर्चामध्ये चांगलेच लक्ष वेधून घेत होते. खासदार गद्दार अशा घोषणाही संतप्त शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या