34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeमहाराष्ट्रशिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

शिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

एकमत ऑनलाईन

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निर्णय
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवाड्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या पहिल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड केली असून, पक्षाचे सर्व अधिकार शिंदे यांनाच देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही माहिती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले.

शिवसेनेची पहिल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेन्सी येथे पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे कोकणातील नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिस्तभंग समितीची स्थापना
आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली. या समितीत भुसे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाई आणि सदस्य संजय मोरे यांचा समावेश आहे. ही त्रिसदस्यीय समिती असेल, असे सांगण्यात आले.

महत्त्वपूर्ण ठराव संमत
-पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे.
-राज्यातील भूमिपुत्रांना सर्व प्रकल्पांमधील नोक-यांमध्ये ८० टक्के स्थान देणे
-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
-स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देणे
-एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणा-या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे आदी ठराव घेण्यात आले असून, हे सर्व ठराव एकमताने संमत करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या