22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवींचा अर्ज दाखल

विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवींचा अर्ज दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या राज्यात सत्तांतर झाल्े आहे. त्यामुळे येत्या काळात विधिमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारे विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरले जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचे नाव निश्चित झाले आहे.

राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल. मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारे विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरले जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत होते. पण ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करत भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. शिवाय त्यांचा अर्जही दाखल करण्यात आला आहे.

‘आणखी दोन अर्ज दाखल करणार’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाबाबत आपले मत मांडले. महाविकास आघाडीकडून अजून दोन अर्ज दाखल केले जातील आणि अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत विचार करून अर्ज मागे घेतले जातील, असे नाना पटोले म्हणाले आहेत. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हेदखील अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या