29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeमहाराष्ट्रशिवसेना एकच आहे, एकच राहणार

शिवसेना एकच आहे, एकच राहणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना एकच आहे, एकच राहणार. मी दुस-या गटाला शिवसेना मानत नसल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या संदर्भातील निकाल लवकर लागला पाहिजे असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद आहे. त्यामुळे शिवसेना एकच आहे, एकच राहणार आहे.

मी दुस-या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव टाकरे म्हणाले. अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचे चिन्ह का गोठवले? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली असल्याचे ते म्हणाले.

शिंदे गटाचे १६ सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता
शिंदे गटाचे १६ सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली असल्याचे ते म्हणाले. सदस्य अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आमच्या शपथपत्रावरही आक्षेप घेतला गेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या