28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना आयटी सेलचे प्रमुख रमेश सोळंकींचा भाजप प्रवेश

शिवसेना आयटी सेलचे प्रमुख रमेश सोळंकींचा भाजप प्रवेश

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजून सुरुच आहे. २१ वर्षांपासून शिवसेना आयटी सेलचे प्रमुख आणि गुजरात राज्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या रमेश सोळंकी यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. खरे तर शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, तेव्हाच सोळंकीनी युवासेना-शिवसेनेच्या पदावरुन राजीनामा दिला होता. मात्र आता त्यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोळंकींचा पक्षप्रवेश झाला.

रमेश सोळंकी हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. २१ वर्षांपासून शिवसेना आयटी सेलचे प्रमुख व गुजरात राज्याचे संपर्क प्रमुख म्हणून ते काम करत आहेत. मुंबईत १५ हजार कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांचे मोठे प्रभावक्षेत्र राहिले आहे. भाजपात त्यांनी आज पक्ष प्रवेश केला आहे. पक्ष वाढीस ते अहोरात्र मेहनत घेतील अशी अपेक्षा आहे. भाजपा त्यांना सन्मानाने चांगले काम देईल असे मी आश्वस्त करतो, असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

रणजीत पाटलांना उमेदवारी
दुसरीकडे, विधानपरिषदेतील अकोला अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला अद्याप सहा महिन्यांहून अधिक काळ आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी अनुमती दिल्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मतदारसंघातील विद्यमान आमदार रणजीत पाटील यांनाच पुन्हा तिकीट देत असल्याचं जाहीर केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या