24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रबंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू

बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असे पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आले आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना पत्र पाठवले आहे.
काय म्हटलंय पत्रात?

पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार, दि. २२ जून २०२२ रोजी वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई ४००००६ येथे सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठविली आहे. त्याव्यतिरिक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्सअ‍ॅप आणि एस. एम. एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरूपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर राहता येणार नाही.

सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या