शिवसेना नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या

  418

  रामपूर – उत्तर प्रदेशच्या रामपूर येथे शिवसेना नेते अनुराग शर्मा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी बुधवारी रात्री अनुराग शर्मा यांची हत्या केली. अनुराग शर्मा हे शिवसेनेचे माजी जिल्हा संयोजक होते. त्यांची पत्नी भाजपाच्या नगरसेविका आहेत.

  अनुराग शर्मा यांच्या हत्येनंतर नातेवाईकांना रुग्णालयात गोंधळ केला. त्यावेळी तोडफोडही करण्यात आली. नगरपालिका रामपूर वार्ड ४ च्या नगरसेविका शालिनी शर्मा याचे पती अनुराग शर्मा यांची अज्ञातांनी ज्वालानगर येथे गोळी मारून हत्या करण्यात आली. अनुराग शर्मा यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.

  Read More  10 ते 12 मृत्युमुखी : पश्चिम बंगाल, ओदिशात अम्फान चक्रीवादळाचा कहर

  अनुराग शर्मा यांच्यावर हत्या, दरोडा अशाप्रकारचे गंभीर गुन्हे होते. गुन्हेगारी इतिहास असूनही ते राजकारणात सक्रीय होते. त्यांची पत्नी वार्डातून अनेक वेळा नगरसेविका म्हणून निवडून येत होती.

  मुरादाबाद झोनचे आयजी रमित शर्मा म्हणाले की, घटनास्थळावर पोलिसांनी जाऊन तपासणी केली आहे. नातेवाईकांचे जबाब घेण्याचं काम सुरु आहे. लवकरच या हत्येतील आरोपींना पकडण्यात येईल. अनुराग शर्मा रात्री घरी परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्यावर २ गोळ्या झाडण्यात आल्या त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.