24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेने केली दगडूशेठ गणपतीची महाआरती

शिवसेनेने केली दगडूशेठ गणपतीची महाआरती

एकमत ऑनलाईन

पुणे : शिवसेनेने महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात हालचाली सुरू केल्या आहेत. पुण्यात देखील या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली.

शिवसेनेकडून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ६२ किलोंचा मोदक अर्पण केला. या महाआरतीच्या वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१ ऑगस्टला एकनाथ शिंदे पुणे दौ-यावर आहेत. या दौ-या दरम्यान ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करणार आहेत, अशी माहिती मिळताच ठाकरेंच्या शिवसेनेने लगेच आज महाआरती केली आहे. त्यामुळे दोन्ही गटात राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे. दरवर्षी नीलम गो-हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गणपतीला मोदक अर्पण करून आरती करतात. आरती ही राजकीय नाही आणि त्याचा १ ऑगस्टच्या आरतीशी संबंध नाही, असे शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी स्पष्ट केले आहे.

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि सध्याची शिवसेना यात फार फरक आहे. त्यांची शिवसेना तत्त्वांवर चालत होती. विचारांवर चालत होती. सध्याच्या शिवसेनेचे तत्त्व आणि विचार बाळासाहेबांच्या विचाराशी संबंंधित नाही यामुळे एकनाथ शिंदे वेगळे झाले.

हिंदूंची विचारधारा मानणा-या भाजपसोबत त्यांनी हातमिळवणी केली. सध्याचे राजकारण हे धर्मावर चालणारे राजकारण आहे. धर्माचा विचार आणि तत्त्व जपणारे राजकारण आहे. त्यामुळे धार्मिक विचारांचे राजकारण आता मंदिरापर्यंत पोहोचले आहे. अनेक ठिकाणी जाऊन दर्शन तर कुठे महाआरत्या करत विचारधारेचा प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे.

पुण्यात महाआरतीमुळे तणाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेना गटाने आपली महाआरती उरकून घेतली आहे. त्यामुळे शहरातील राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे नुकतेच एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर मावळात शिवसेनेच्या पडझडीस आता सुरुवात झाली आहे. त्यांच्यासोबत आता नेमके कोण कोण शिंदे गटात सामील होणार?, याची शिंदे गटाला उत्सुकता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या