24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रफॉक्सकॉन परत आणण्यासाठी शिवसेना सरकारला सहकार्य करायला तयार

फॉक्सकॉन परत आणण्यासाठी शिवसेना सरकारला सहकार्य करायला तयार

एकमत ऑनलाईन

मुंबई : फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत. यासाठी शिवसेना सरकारला वाटेल ते सहकार्य करेल, असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांनी केले. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे केंद्राशी सलोख्याचे संबंध असल्याचेही देसाई म्हणाले.

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यावरून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडले आहे.

गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवले आहे. या त्यांच्या टीकेनंतर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी राज्य सरकारवर पलटवार केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या