26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेने सर्व याचिका मागे घ्याव्यात, बहुमताचा आदर करावा

शिवसेनेने सर्व याचिका मागे घ्याव्यात, बहुमताचा आदर करावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही. मात्र जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रकरणातील सर्व याचिकांवर सुनावणी घेत नाही, तोपर्यंत आमदारांवर कारवाई करु नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना केली आहे.

न्यायालयाच्या या सूचनेनंतर भाजपाचे नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने बहुमताचा आदर करावा, जर्व केसेस तसेच याचिका मागे घ्याव्यात, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेची ही परिस्थिती केविलवाणी आहे. ज्या दिवशी अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये आणि विश्वासदर्शक ठरावात १६४ मते मिळाली; त्याच दिवशी शिवसेनेने सर्व याचिका मागे घ्यायला हव्या होत्या. १६४ डोकी मोजली गेली. इतकं मोठे बहुमत त्यांना मिळालं आहे.

चिडून ते केसेस करत आहेत. मला वाटत की, १६४ डोकी मोजली गेली हे सुप्रीम कोर्टाला कोर्टालाही समजलं आहे. माझी शिवसेनेला विनंती आहे, की सर्व याचिका मागे घ्याव्या आणि जनादेशाचा आदर करावा,’ असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या