22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रराक्षसी महत्त्वाकांक्षी पोटी शिवसेनेला संपवायला निघालेत : आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्ला

राक्षसी महत्त्वाकांक्षी पोटी शिवसेनेला संपवायला निघालेत : आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्ला

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. वार करायचे असतील तर समोरुन या, असं आव्हान आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिली मुलाखत एबीपी माझाला दिली.

यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. वरळी मतदारसंघातील कोळीवाड्याच्या दौ-याच्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आदित्य ठाकरे म्हणाले की, काल उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. हे अपेक्षित नव्हते, मात्र झाले. आता लढायचं आणि जिंकायचे आहे, पुढे जायचे आहे. आपल्या राज्यात जे चाललंय ते घटनाबा आहे. गद्दारांचे सरकार हे घटनाबा आहे. संविधानाला सुद्धा यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

अडीच वर्षांपासून प्रयत्न
खोके सरकारमधला जो काही गद्दारांचा गट आहे तो एकदम निर्लज्जपणे राजकारण खालच्या पातळीवर नेत आहे. इतकं घाणेरडे राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच पाहिले नव्हते. त्यांना आसुरी आनंद जो शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करताना मिळतो आहे. तो त्यांना कधीच मिळणार नाही. खोके सरकारने स्वत:ला विकले आहे. दोन-तीन नेत्यांच्या स्टेटमेंटवरुन असे दिसते आहे की शिवसेना संपवून टाकायची आहे. अडीच वर्षापासून अशाप्रकारचे प्रयत्न सुरु होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या