26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रबहुमत चाचणीच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी : सुप्रीम कोर्ट

बहुमत चाचणीच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी : सुप्रीम कोर्ट

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने तातडीने याप्रकरणी सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.

अभिषेक मनू सिंघवी यांनी अशा प्रकारे तातडीने बहुमत चाचणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यानंतर दोन्ही न्यायाधीशांनी आपापसांत चर्चा केली. कोर्टाने म्हटले की याविषयीची आम्हाला कागदपत्रं द्यावीत. त्यावर आम्ही आज चार वाजेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करू, असे सिंघवी यांनी म्हटले.

आमच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यानंतर सुनावणी झाली तर आमचे म्हणणे निरर्थक ठरेल, असे सिंघवी यांनी म्हटले. यावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला की, बहुमताच्या चाचणीसाठी अधिवेशन बोलावणे हा राज्यपालांचा अधिकार आहे, त्यात कुणी ढवळाढवळ करू शकत नाही, असे शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी म्हटले. राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले.

यावर न्या. सूर्यकांत यांनी आजच या प्रकरणी सुनावणी होईल. दुपारी तीन वाजेपर्यंत कागदपत्रं तयार ठेवा, असे कोर्टाने म्हटले आहे. संध्याकाळी पाच वाजता यावर सुनावणी होईल, असेही कोर्टाने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या