21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयशिवसेनेच्या याचिकेवर आजच होणार सुनावणी

शिवसेनेच्या याचिकेवर आजच होणार सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिले. परंतू बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शिवसेना नेते सुनिल प्रभू यांनी बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्विकारली असून न्यायालय याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता सुनावणी घेणार आहे.

शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात म्हटले की, आम्ही मागच्या सुनावणीतच भीती व्यक्त केली होती की, पुढच्या काही दिवसात अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. ती भीती खरी ठरली.

न्यायालयाने तीन वाजेपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सायंकाळी 5 वाजता सुनावणी होईल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य आता न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या